- पालिका आयुक्तांकडून सविस्तर नियमावली जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील हेल्थ केअर वर्कर, फ्रटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्ती ज्यांनी कोविड १९ लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना कोविड १९ लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. प्रिकॉशन डोसकरीता संबंधित लाभार्थीचे कोविड १९ लसीचा दुसऱ्या डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
तसेच ६० वर्ष वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्ति त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्याने प्रिकॉशन डोस घ्यावा. सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना प्रिकॉशन डोसकरीता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखविण्याची आवश्यकता नाही. प्रिकॉशन डोस घेण्यासाठी कोविन ऍपमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
हेल्थ केअरवर फ्रन्ट लाईन वर्कर व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरीक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरन प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुसऱ्या डोसनंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले लाभार्थीच प्रिकॉशन डोससाठी पात्र ठरतील. सर्व हेल्थ केअर वर्कर फ्रंटलाईन वर्कर, ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यांची नोंदणी कोविन ऍपमध्ये नागरिक म्हणून झालेली आहे, अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोससाठी पात्र होण्यासाठी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच अशा व्यक्तिचे लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑनसाईट पध्दतीने उपलब्ध असेल. कोविन सिस्टममधून अशा व्यक्तिला प्रिकॉशन डोस घेण्यासाठी संदेश ( SMS ) प्राप्त होणार आहे. नोंदणी व लसीकरणाची वेळ ही ऑनलाईन किंवा जागेवरच ( Walk in ) or on the spot registration स्वरुपात घेता येईल. प्रिकॉशन डोस घेतल्यानंतर कोविन सिस्टममधून प्रमाणपत्र मिळवता येईल. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून प्रिकॉशन डोस घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.