- मावळातील पवना रुग्णालयात उपचार सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- १९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेले बॉलिवूड अभिनेते हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करीत होते. ऊर्से टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारने दुभाजकाला धडक दिली.
अपघातात हेमंत बिरजे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तिघांवर सध्या पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात दाखल हेमंत बिरजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “सर्दी झाली म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे डुलकी लागली आणि गाडी जाऊन दुभाजकावर आदळली. त्यानंतर गाडीवर नियंत्रण मिळवलं. गाडीत मी, माझी पत्नी आणि मुलगी असे तिघेच प्रवास करत होतो. काही गंभीर दुखापत झालेली नाही”.