न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली येथील अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. १२) कारवाई करण्यात आली.
कारवाईत १५ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड पाडण्यात आली. महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली येथील गट नंबर १३२५, १३२६, १३७१ व १६२२ येथील सात पत्राशेड, सात आरसीसी बांधकाम व वीट बांधकामे पाडण्यात आली.
कारवाई सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुधीर मोरे, सुर्यकांत मोहिते, हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ राऊत यांनी पोलिस बंदोबस्तात केली.