- न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबूकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, शोभा श्रीकांत, सिल्व्हीनिया जाधव मॅडम, प्रब्जोत गील, सचिन कळसाईत, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना चाबुकस्वार म्हणाले, राष्ट्रमाता जिजामाता यांनी प्रजेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण केले. जिजाईमाता, रमाईमाता, अहिल्यामाता होळकर व सावित्रीमाता फुले यांनी खूप कष्ट केले. त्या सर्वांच्या माता होत्या. त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे.
इतर शिक्षक वर्गांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सचिन सर यांनी सूत्रसंचालन केले व पाहुण्याचे आभार मानले.