- अ प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- प्रभाग क्रमांक १९ आनंदनगर येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणी समस्येसह इतर समस्या भेडसावत आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते. वेळकाढूपण करीत होते. नागरिकांच्या या समस्यांची नगरसेवक तथा अ प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे यांनी गंभीर दखल घेतली.
पालिकेच्या पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना प्रभागात पाचारण केले. अधिकाऱ्यांसह नगरसेवक मोरे यांनी प्रभागातील प्रलंबित आणि अपूर्ण कामांची पाहणी केली. तसेच ही कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
यावेळी अ ‘ प्रभागाचे मुख्य आरोग्यधिकारी पुंडलीक दरवडे, आरोग्यधिकारी योगेश फल्ले, झो.नु.पू. विभागाच्या डेप्युटी इंजि. मोमीन, विद्युत विभागाचे डेप्युटी इंजि. बाळू लांडे, ज्यू. इंजि. शामसुंदर बनसोडे, वॉटर डेप्युटी इंजि. कविता माने, ज्यू. इंजि. किरण सगर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.