न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती शक्ती चौकाजवळील हॉटेल पूना गेट येथे सोमवारी (दि. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी कारमधून आला. जेवणाचे एवढे बिल का लावले असे म्हणून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून कमरेच्या बेल्टने मारहाण केली.
यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली. त्यांनतर आरोपीने फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून नेले. सुरज श्रीधर शेट्टी (वय ३३, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अक्षय तुकाराम उदगिरे (वय २६, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले तपास करीत आहेत.