- उपाध्यक्षपदी अभिषेक कादगिर यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- देहूरोड भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी महेश द्रविड तर, उपाध्यक्ष पदी अभिषेक कादगिर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे, देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, नगरसेवक रघुवीर शेलार, युवानेते विलास शिंदे, दिनेश सिंग, मदन सोनिगरा, दत्तामामा काळभोर, उमाशंकर सिंग तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.