न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या पुलाच्या दुरुस्ती कामातील तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील पिंपरी पूल ते पुलाच्या मध्यपर्यंत काम करण्याचे नियोजित आहे. यासाठी या पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केली जाणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी भाटनगर मार्गे, रिव्हर रोड – कराची चौकापर्यंत वाहतूक दुहेरी मार्गाने राहणार आहे.
तसेच निगडीतील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाची रंगरंगोटी तसेच स्थापत्य विषयक कामासाठी हा पूलही वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडून येणारी वाहने पुलावर न जाता डाव्या बाजूच्या ग्रेडसेप्रेटमध्ये आउट लेनमधून बाहेर पडतील. त्यानंतर टिळक चौकामार्गे सेवा रस्त्याने निगडी प्राधिकरण चौकीसमोरून पुढे जातील. तसेच मुंबईकडून येणारी वाहने पुलावरून निगडी गावठाण येथील हनुमान मंदिराशेजारी आउट लेनमधून बाहेर पडून टिळक चौकाकडे जातील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.