- शेळके शहर राष्ट्रवादीतील गट-तट उध्वस्त करणार?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकांची पूर्वतयारी व सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर खडकवासला, कर्जत व चिंचवड या भाजपच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यातआहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शेळके यांना पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, विरोधकांवर मात करून विजय मिळवून आमदार शेळके हे जबाबदारीने कार्यरत आहेत; तसेच विकासकामांवरही विशेष लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या यांच्या सूचनेनुसार खडकवासला, कर्जत व चिंचवड या भाजपच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शेळके यांना देण्यात आली आहे. या तीनही मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांशी समन्वय साधून दौरा करणे, तेथील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन बूथ बांधणी, विविध कार्यक्रम व पक्षसंघटना बळकट करण्याच्या उद्देशाने नियोजन करणे.
गट तट संपवणे, आवश्यकतेनुसार राजकीय प्रभावी व्यक्तींना आणणे, सूचना व निरीक्षण कळवणे आदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पूर्वतयारी करणे व सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन जबाबदारी सांभाळावी अशी सूचना करण्यात आली आहे.