- आकुर्डीतील घटना; पोलिसांचा तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- आकुर्डी येथील वेदांत रेसिडन्सी या सहा मजली इमारतीमधील नागरिकांना पाण्याचा वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी टेरेसवरील टाकीत जाऊन पाहिले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेतील पुरूषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
मात्र दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एक वेडसर इसम आईला शोधत आला होता. त्याचाच पाण्यात पडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाच वर्णनाचा एकजण वाल्हेकरवाडी भागात राहत असून तो देखील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजते. मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. ही घटना आकुर्डी येथे शुक्रवारी (दि. 18) सकाळी घडली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत खुळे यांनी माहिती दिली.