- वन विभागाकडून बिबट्याची जंगलात रवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२२) :- चाकणमधील एमआयडीसीत ७ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभगाला यश आलं आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याला कैद करण्यात आले आहे.
बिबट्या पकडल्याचं वृत्त समजताच कंपनीतील कामगारांसोबतच वन विभाग आणि पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा बिबट्या अडीज वर्षांचा आहे. वन विभागाने त्याला पकडल्यानंतर दूर जंगलात सोडलं आहे.
चाकण एमआयडीसी मध्ये मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये पहाटे सुरक्षा रक्षकाला बिबट्या दिसला होता. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना माहिती देऊन बिबट्याला शोधण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली.