- फार्म हाऊसवर काम करणाऱ्या तरुणाच्या घरी लावली हजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२२) :- मावळ चांदखेड येथे फार्म हाऊसवर काम करणाऱ्या तरुणाच्या वडिलांचं नुकतच निधन झालं, त्याच्या कुटुंबाच सांत्वन करायला चक्क बॉलिवूडचे भिडू जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावली.
जॉकी श्रॉफ यांनी घरी जाऊन गायकवाड कुटुंबाची भेट घेतली. जॅकी यांनी जमिनीवर बसून आपुलकीने गायकवाड कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत गप्पा मारल्या. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची विचारपूस केली. जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे गायकवाड कुटुंबीय भारावून गेले.