न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- महापालिकेची मुदत संपल्याने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची दालने रिकामी झाली आहेत. प्रशासक राजेश पाटील यांनी सर्व दालनांना १४ मार्च रोजी ‘ सील ‘ करून बंद केली आहेत. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियुक्त कर्मचाऱ्यांची पर्यायी ठिकाणी नियुक्ती केलेली नव्हती. फक्त सहा जणांची पाणीपुरवठा विभागात नियुक्ती केली होती. २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नव्हती त्यांच्या नियुक्तीचा आदेश प्रशासक पाटील यांनी सोमवारी (दि. २८) काढला.
कोरोनाची पार्श्वभूमी व इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. १३ मार्च रोजी पंचवार्षिक मुदत संपल्याने १४ मार्चपासून प्रशासक म्हणून आयुक्त पाटील यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते, विषय समित्या व प्रभाग समित्यांचे अध्यक्ष यांच्या कक्षातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची तात्पुरत्या स्वरूपात अन्य विभागात नियुक्ती केली आहे.
यामध्ये एक लघुलेखक, तीन मुख्य लिपिक, पाच लिपिक, चार वाहन चालक, दोन कॉम्प्युटर ऑपरेटर, तीन १६ शिपाई यांचा समावेश होता. त्यांची नियुक्ती आता शिक्षण, करसंकलन, वैद्यकीय, पाणीपुरवठा, क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, रुग्णवाहिका, बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, प्रशासन, दूरसंचार, उद्यान, नगररचना, वायसीएम रुग्णालय, निवडणूक आदी विभागात नियुक्ती केली आहे.