- जुन्या भांडणाचे कारण; चौघेजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२२) :- थेरगावातील बारणे कॉर्नर येथे असताना आरोपी कारमधून आले त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून कारमध्ये बसवले. पुनावळे येथील जंगलामध्ये नेले. आरोपींनी फिर्यादीला कोयता, पट्टा, हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीला वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन जवळ सोडून निघून गेले.
ही घटना मंगळवारी (दि. २९) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. दीपक सुभाष आल्हाट (वय २२ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सौरभ काळे (रा. थेरगाव), दीपक तेलंगे (रा. थेरगाव), बंटी लोखंडे (रा. वाल्हेकरवाडी), सुनील सुभाष जाधव (रा. थेरगाव), अरविंद मुन्ना शर्मा (रा. थेरगाव), हिरा शेख (रा. पुनावळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.