- कोयत्याच्या धाकाने एकाची लुट, मोटारीचेही नुकसान; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२२) :- ‘तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत, तेवढे काढून दें, तुला जिवंत सोडणार नाही, तुझा कार्यक्रम संपल, ‘ अशी धमकी देऊन, फिर्यादीच्या खिशातील सहाशे रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर घरासमोरील मोटारीची तोडफोड करीत दहशत माजवली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.
रामदास पोपट भिवरकर (रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज गायकवाड ऊर्फ वंट्या (वय २२, रा. दत्तनगर, चिंचवड), अनिल ऊर्फ अन्या ऊर्फ संतोष गोरख जाधव (वय ३० रा कुदळवाडी, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुप्रिम काळे, विनायक क्षीरसागर, सज्जाद शेख, नाईटी, नीलेश होळकर (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत .