- दापोडीतील घटना; चौघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- बांधकाम साईटवर काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे. बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असं फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रसंग २२ मार्च २०२२ रोजी दापोडी येथे घडला. जयश्री प्रकाश चलवारे (वय ४५) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा मुलगा शंकर प्रकाश चलवारे (वय २६, महात्मा फुले नगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी जुबेर गाझी, फजल खान (दोघेही रा. दापोडी) आणि इतर दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.