न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- १६ वर्षीय मुलीला शाळेत कमी गुण मिळाले. त्यामुळे तिची आई तिच्यावर रागवली. त्यातून फिर्यादी महिलेने चक्क स्वतःच्या मुलीला भक्ती शक्ती चौक, निगडी येथील अण्णाभाऊसाठे पीएमपीएल जंक्शन बस स्टॉप येथून निगडी ते कात्रजला जाणाऱ्या बसमध्ये बसवले.
त्यानंतर मुलीचे अपहरण झाले, अशी तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ एप्रिल २०२२ रोजी घडला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.