न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाल्यानंतर अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत.
यात विवेक वसंतराव मुगळीकर यांची वाकड पोलीस स्टेशन मधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन येथे तर, सत्यवान बाजीराव माने नियंत्रण कक्ष सध्या शिरगाव पोलीस चौकी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन, बाळकृष्ण साहेबराव सावंत हिंजवडी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमओबी/पीसीबी, मनोज बाबुराव खंडाळे नियंत्रण कक्ष सध्या संलग्न एमओबी/पीसीबी शाखा तेआर्थिक गुन्हे शाखा, वनिता कृष्णा कदम/धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव पोलीस चौकी.