- आयुक्तांकडून दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईनंतर देण्यात येणाऱ्या पावती मध्ये महापालिका कर्मचारी फेरफार करून महानगरपालिकेची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पावती देताना एक रक्कम दाखवली जात आहे तर ओसीवर दुसरी रक्कम दाखवून सर्वसामान्य लोकांची लूट करण्यात येत असल्याबाबत तक्रार प्राप्त होत आहेत. सामान्य पावती पुस्तकावरील नोंदीमधील तफावत असल्याबाबतच्या प्रियांका शिंदे व दिपाली जगदाळे यांनी सादर केलेल्या खुलाशावर यांचा खुलासा संयुक्तिक वाटत नाही, असा अभिप्राय क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेला आहे.
या प्रकरणी आयुक्त तथा प्रशासक यांनी प्रियांका शिंदे व दिपाली जगदाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिलेले आहेत.