न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२२) :- देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्यावत सुविधा देण्यात आल्या आहेत. या शाळेतील मुलांना शिक्षणासाठी टॅब, सुसज्ज शाळा, शाळांमधील रंग – संगतीसह आदी सुविधा दिल्या आहेत. या शाळांची पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्यासह चार जणांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पाहणी केली आहे.
या पाहणी दौऱ्याबाबत माहिती देताना उपायुक्त खोत म्हणाले, मुंबई महापालिकेच्या १ हजार १२७ शाळा आहेत. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा, शिक्षण देण्यात येते. शाळांमधील रंग – संगती, पुरेसा सूर्यप्रकाश, क्रीडांगणे आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
तसेच शाळांमधील विविध कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्गही नेमण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्या शाळात राबविलेल्या विविध उपक्रम आणि सुविधा पाहून छान वाटले. याच धर्तीवर शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.