न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सर्व शाळा, अंगणवाडी व बालवाडयांमध्ये सोमवारी (दि. २५) रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन आणि २९ एप्रिल रोजी मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे.
दरम्यान महापालिकेच्या सर्व दवाखाना व रूग्णालयांमध्ये (दि. २५ एप्रिल ते २२ मे २०२२) या कालावधीमध्ये “जंतनाशक मोहिम कॉर्नर कार्यास्थित करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी १ ते १० वर्षे वयोगटामधील सर्व मुले व मुलींना जंतनाशक गोळ्या या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निरीक्षणाखाली मोफत सेवन करण्यासाठी दिल्या जाणार आहेत.
नागरिकांनी १ ते १० वर्षे वयोगटातील पाल्यांना जंतनाशक गोळी देण्यासाठी नजिकच्या पालिकेच्या दवाखान्यात घेवून जावे, असे आवह पालिकेने केले आहे.