- महाराष्ट्रातून एकमेव खेळाडुची निवड; शाळेच्या संस्थापकांनी केला भव्य सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी कुणाल सचिन येवले याने पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी तक मनाचा तुरा खोवला आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात अल्पावधीतच गगणभरारी घेणा-या कुणालची इंग्लंडच्या मॅंचेस्टर युनाटेड युथ कॅम्पसाठी निवड झाली आहे.
मॅंचेस्टर युनायटेड युथ कॅम्पसाठीची निवडप्रक्रिया चेन्नई येथे २४ एप्रिल रोजी पार पडली. कुणालने आपल्या क्रीडा क्षेत्रातील निपुणतेच्या जोरावर उल्लेखनिय कामगिरी केली. त्याची मँचेस्टर युनायटेड युथ कॅम्पसाठी निवड झाल्यानंतर चॅलेंजर पब्लिक स्कुलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांनी त्याचे जाहीर कौतुक केले. त्याचा विशेष सत्कार करून पुढील कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
कुणालची १८ वर्षाखालील गटामध्ये निवड झाली आहे. मँचेस्टर युनायटेड युथ कॅम्पसाठी निवड झालेला कुणाल हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. याअधी कुणालची आय-लीग आणि पीडी एका त. था. संघासाठी देखील निवड झाली होती.
याप्रसंगी शाळेच्या उपाध्यक्षा अनिताताई काटे म्हणाल्या की, चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मैदानावर कुणालने आपल्या खेळाची सुरुवात केली. स्कूलतर्फे खेळत असताना त्याची कामगिरी कायमच चमकदार राहिली आहे. कुणालच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. त्याच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे पिंपळे सौदागरसह पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.