न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२२) :- मुलाच्या संपर्क कार्यालयात आरोपी हे शनिवारी (दि. ७) सायंकाळी साडे सातच्या सुमारास शिरले. तलवार व लोखंडी पाईपने संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली. मारण्याची धमकी दिली. त्याच्या शेजारी राहणाऱ्यालाही मारहाण केली.
याप्रकरणी अनिता लक्ष्मण सरवदे (रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप नलावडे (रा. बालाजीनगर, भोसरी) व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.