न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- संत तुकारामनगर येथे फिर्यादी व त्यांचा मित्र पान घेण्यासाठी गेले. त्यावेळी झालेल्या वादावरून आरोपीने फिर्यादीला मारण्यासाठी लाकडी स्टंप उगारला. मात्र फिर्यादीने तो पकडून फेकून दिला.
त्यानंतर दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरी येथे घडली. विक्रांत विठ्ठल गोरडे (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि. ८) रात्री नऊच्या दरम्यान घडला.
प्रशांत येरुनकर (वय ३६), सागर शिर्के (वय ३८), समीर कलापुरे (वय ३५, सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी), जे. के. भाई (वय ४०, रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.