न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२२) :- दुकानात प्रवेश करीत ‘तुम्हाला माज आला आहे. तुम्ही आमची तक्रार अतिक्रमण विभागात केली आहे का?’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी हॉटेल व्यावसायिक दोन भावांना मारहाण मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खाद्य पदार्थाचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी सव्वापाच वाजता भोसरी भाजी मंडई व्यापारी संकुल येथे घडला.
ईश्वर भगवान बो-हाडे (वय ४२, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण गजानन फुगे, मनोज अशोक परदेशी, भानुदास बबन लांडगे, महेश बबन लांडगे, गजानन फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.