न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- घरासमोर दारू पिणाऱ्या आरोपीने विनाकारण फिर्यादी यांचा मोठ्या मुलाला ‘ए भाडेकरू तुझ्या घरात चपातीला तेल नसते. तू भाडेकरू आहे. एवढा रुबाब का दाखवतोय’ असे म्हटले. त्यावरून दोघात भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा लहान मुलगा गेला. त्यावेळी आरोपीने दोघांना मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी दोन्ही मुलांना घेऊन घरी गेल्या. त्यानंतर शिवीगाळ करून फिर्यादी यांना ‘तुझी पोरं कुठं आहेत. माझ्या भावाला दोघांनी मारले आहे. तू त्यांना घराबाहेर काढ.’ फिर्यादी यांनी नाही म्हटले असता आरोपीने फिर्यादी यांना लाकडी काठीने मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ८ मे रोजी रात्री अकरा वाजता थेरगाव येथे घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन आडसूळ (वय ३५), राजेश आडसूळ (वय २८, दोघे रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.