न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- पिंपळे सौदागर येथील दवाखान्यात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. हा उपक्रम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात आपले सख्खे नातेवाईकसुद्धा जवळ जान्यास घाबरत होते, अशा काळामध्ये नर्सने पेशंटची प्रामाणिकपण काळजी घेतली, असे उदगार चाबुकस्वार यांनी काढले.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र सरचिटणीस जितेश जगताप, पिंपळे सौदागर मधील डॉ. प्रफुल तपशालकर, ज्योती शिंदे, पुनम खुणे, सुनीता पवार, किरण दोडके आदी उपस्थित होते.