न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आज गुरुवारी (दि. १२) रोजी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली.
यात पहिली कारवाई “क” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी ते पांजरपोळ पर्यंत ६१ मी. रस्ता रूंदीतील दुतर्फा अतिक्रमणे निष्कासीत करण्यात आली. प्रभाग क्र. ०६ व ०९ येथे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने कारवाईमध्ये १२५ (पत्राशेड / बांधकामे) अंदाजे क्षेत्रफळ ८३३०.०० चौ.मी. (८९६३० चौ. फुट) अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. स्थापत्य विभागाकडील जेसीबी-०४, लेबर-१०, “फ” स्थापत्य विभागाकडील जेसीबी-०३, लेबर-१०, डंपर-४, गॅस कटर-१, क्रेन – १, मजूर-१५ आदी कारवाईत सामील झाले होते.
‘ ब ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पवना नदी पत्रातीला जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ पत्राशेड असे एकुण अंदाजे ४११९ चौ.मी अनाधिकृत निष्कासित केली. ०६ मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक, २१ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील १ आर.सी.पी., प्लोटुन (१५ पोलिस कर्मचारी) महाराष्ट्र पोलिस सुरक्षावल ५४ कर्मचारी, ६ जेसीबी २ क्रेन तसेच २० मंजुर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
” ई ” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे नाशिक ६१ मी. दुतर्फा रस्तामधील पहिल्या टप्प्यातील प्रभाग क्र. ०३ मौजे मोशी (मोशी टोलनाका ते बनकर वस्ती) येथील कारवाईत ४५ ( पत्राशेड / वीट बांधकामे / आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ ४५,००० चौ. फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
“ड” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ येथील कारवाईमध्ये ४२ (पत्राशेड / बांधकामे) अंदाजे क्षेत्रफळ (६७००० चौ. फुट) अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करणेत आली. मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी – ०८, सांगवी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक- १ पोलीस उपनिरीक्षक -१, इतर पोलीस कर्मचारी -१५ तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ७० सुरक्षा रक्षक, विद्युत विभागाचे कर्मचारीउपस्थित होते. “ड” स्थापत्य विभागाकडील जेसीबी-०२, लेबर-१०, “ग” स्थापत्य विभागाकडील जेसीबी-०२, लेबर-१०, गॅस कटर-१, मजूर-२० आदी कारवाईत सामील होते.