न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजन करण्यात येते. मात्र येत्या सोमवारी दि. १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवारी होणारी जनसंवाद सभा मंगळवार दि. १७ मे रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन येत आहे.
आतापर्यंत आठ सभा पार पडल्या असून यामध्ये सुमारे एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. जनसंवाद सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.