न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आज शुक्रवारी (दि. १३) रोजी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली.
यात ‘ ब ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पवना नदीपात्रातीला जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईमध्ये २ आरसीसी बांधकामे, ३ वीट बांधकाम, १० पत्राशेड असे एकुण अंदाजे ५१६० चौ.मी अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
“क” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुणे नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य ते बोराटेवस्ती पर्यंत ६१ मी. रस्ता रूंदीतील अतिक्रमणे निष्कासीत करणेची कारवाई प्रभाग क्र. ०२ व ०८ येथे आज दि.१३/०५/२०२२ रोजी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करणेत आली. सदर कारवाईमध्ये ४२ (पत्राशेड / बांधकामे) अनधिकृत पत्राशेड निष्कासीत करणेत आली. सदर कारवाईत निष्कासीत केलेले पत्राशेडचे अंदाजे क्षेत्रफळ ३०२६६ चौ.फुट आहे. तसेच सदर कारवाईत ४२ टप-यांचेही निष्कासन करणेत आले.