न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- आमदार महेशदादा लांडगे युवा मंचाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कुदळवाडीत दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रामकृष्ण लांडगे महाराज यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महेशदादा लांडगे युवामंचाचे अध्यक्ष दिनेश यादव, रामलाल देवासी, हरिप्रसाद मोर्य, दिपक घन, मोईद शेख आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाळूंज यांनी श्री छत्रपती संभाजी महाराजाच्या कार्याविषयीची तरुणांना माहिती दिली. तसेच सध्याच्या तरुण पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.