न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- U-12 व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत नेक्स्ट अकॅडमीला विजेतेपद मिळाले. पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान ह्यांच्या हस्ते पार पडला.
या समारंभास माजी रणजीपटू श्रीकांत कल्याणी, अकॅडमीचे प्रशिक्षक मोहन जाधव, शादाब शेख, भुषण सूर्यवंशी, चंदन गंगावणे, चिंतामणी वैद्य आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
रियाझ बागवान म्हणाले, भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे येथून घडणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यास सज्ज होत आहेत.
अंतिम सामना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी झाला. अंतिम सामनावीर युग सोनिगरा, स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज
आयरा जाधव, महेंद्र गोखलेज अकॅडमी, सर्वोत्तम गोलंदाज विरेन मिरजे, वेंगसरकर क्रिकेट अकॅडम, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक प्रज्वल मोरे वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी, स्पर्धेचा सर्वोत्तम मानकरी खेळाडू प्रज्वल मोरे, वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी