- थेरगाव बेलठिकानगरमधील घटना; मुलाची पोलिसात धाव…
पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- कोणत्यातरी हत्याराने फिर्यादीच्या पत्नीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे वडील यांनी मारहाण केली. यात फिर्यादी यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर फिर्यादीचे वडीलांनी त्यांच्या स्वत:च्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. बेलठिकानगर, थेरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी सूशील यांची पत्नी यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेलठिकानगर, थेरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकांत मारूती वनवे (वय ७४), असे आत्महत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मयत सूर्यकांत वनवे यांचा मुलगा सुशील सूर्यकांत वनवे (वय ३८, रा. बेलठिकानगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत सूर्यकांत वनवेे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.