- दोन परप्रांतीयांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- सिझा भंगार माल खरेदी विक्री करण्याच्या भंगाराच्या दुकाणात आरोपी हे जीएसटी अधिकारी नसताना त्यांनी तसे बनावट ओळखपत्र तयार करून जवळ बाळगले. आपण जीएसटीचे अधिकारी आहोत, असे फिर्यादी यांना सांगून फिर्यादी विरोधात जीएसटीची केस न करण्यासाठी पैशांची मागणी केली.
हा प्रकार शुक्रवारी (दि. २०) दुपारी पावणे चार वाजता कुदळवाडी येथे घडला. शादान अब्दुल अजीज खान (वय २७ रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोजकुमार छबीनाथ, ओमप्रकाश जगदंबा प्रसाद पाण्डेय (दोघे रा. मुखर्जीनगर, उत्तर पश्चिम दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.