न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- घराच्या बाजूला तरूण थांबला होता. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे म्हणून फिर्यादीला बाजूला नेले. फिर्यादीने आरोपीचा दारुचा धंदा पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलीस चौकीत तक्रार दिली होती.
त्या रागातून आरोपीने फिर्यादिच्या डोक्यात फरशी मारली. तर, इतर आरोपीने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर, पायावर मारहाण केली. छातीवर दगड फेकून मारले. शिवीगाळ करत हाताने मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार शनिवारी (दि. २१) रात्री साडेदहाच्या सुमारास रमाबाईनगर रावेत येथे घडला. विशाल अप्पा चंदु कदम ( वय ३१, रा. रावेत) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगाधर देवेंद्र नाटेकर (वय २२), दिपक वाल्मिक घनगाव (वय २३, दोघे रा. रमाबाईनगर, रावेत) यांना अटक केली. तर, त्यांचे साथीदार मोनेश देवेंद्र नाटेकर, रोहन वाल्मिक घनगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.