- ८ जूनच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका आणि त्यांच्या संपूर्ण यंत्रणेने आगामी निवडणुकीसाठीची प्रभागरचना नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेसह सर्व प्रतिवादी यांना ८ जूनच्या आतमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग रचनेसंदर्भात वारंवार लेखी तक्रारी हरकती घेऊन महापालिका व राज्य निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मडिगेरी यांनी महापालिकेच्या प्रभागरचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ वकील एस. एम घोरवडकर व ऋतिक जोशी यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्यायमूर्ती पी. डी. नाईक आणि खंडपीठासमोर न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या सुनावणी झाली.
महापालिकेने चुकीच्या पद्धतीने प्रारूप व अंतिम प्रभागरचना जाहीर केलेली आहे. त्या संदर्भात लेखी कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. लोकसंख्या आरक्षणे याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन झालेले नाही. या बाबी उच्च न्यायालयापुढे मांडलेल्या असून याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेला आता उत्तर द्यावे लागणार आहे.
– मा. विलास मडिगेरी…