न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- महिलेला नको असतानाही आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करून पाठलाग केला. तसेच प्रेम संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला.
आरोपीने त्याच्या व्हाट्सअपवर फिर्यादी महिलेची बदनामी करणारे स्टेटस ठेवून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. दिघी रोड भोसरी येथे २० मार्च ते २६ मे या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित महिलेने शुक्रवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अभिलाश राऊत (वय २९, रा. अमरावती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तपास करीत आहेत.