- मुक्ता महामुनी, वैष्णवी कुलकर्णी, अॅडरिना रॉड्रिक प्रथम क्रमांक पटकाविला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खरतर यावर्षीच्या विद्यार्थ्यांची दोलनामय मन:स्थिती होती, तरीही पालक आणि शिक्षकांच्या साथीने विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली. यावर्षी महाविद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला.
विज्ञान शाखेतून महामुनी मुक्ता अरविंद हिने ९४ टक्के गुण प्राप्त करून प्रथम, देवघरे श्रावणी मनिष हिने ९३.३३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर जाधव अदिती संतोष हिने ८९.६७ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून कुलकर्णी वैष्णवी दीपक हिने ९०.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम, अन्सारी शोएब याने ८८.६७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर साळी धनराज रुपेश याने ८८ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेतून रॉड्रीक ऍडरिना हिने ९१.५० टक्के गुण प्राप्त करून प्रथम, शाह रिया अमर हिने ९०.१७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर रंजन आदित्य याने ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, मुख्यप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षक-पालक संघ प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.