- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
तसेच, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण @msbshse @MahaDGIPR. या अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी देखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.