- वारकर्यांना राजगिरा लाडू, शेंगदाना चिक्की, बटाटा चिवड्याचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमधील राष्ट्रीय सेवा योजनातील सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापकांनी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सूचनेनुसार आकुर्डीतील मुक्कामास असलेली पालखी पुण्याकडे प्रस्थान झाल्यानंतर हजेरी लावली.
आज सकाळी ६ वाजता महाविद्यालयातील एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रा. गुरुराज डांगरे, डॉ. महिमा सिंग, डॉ. पल्लवी चुग, प्रा. सुरभी रोडी, प्रा. प्रिया माथुरकर तसेच, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज मधील प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद बोरगे, प्रा. अश्लेषा देवळे, डॉ. आनंद लुंकड, प्रा. पी.टी. इंगळे आदी विद्यार्थ्यांनी काळभोरनगर येथे वारकर्यांना राजगिरा लाडू, शेंगदाना चिक्की, बटाटा चिवडा वाटप करण्यात आला.
तसेच, ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात विद्यार्थी व प्राध्यापकांनी वारकर्यांच्या दिंडीत सहभागी होत एच.ए. कॉलनीतील विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत सहभाग नोंदविला.