न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग टीमचे शशांक खांडेकर हे उपस्थित होते. त्यांनी योगा केल्याने होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले.
तसेच उपस्थित नागरिकांना योग करण्याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर दररोज योगा करणार, निरोगी शरीर, शांत मन तसेच बुद्धीची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, असा निश्चय उपस्थितांनी केला.
शाळेतील विद्यार्थिनी आपल्या नृत्यातून योगाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगूळकर, पर्यवेक्षिका धनश्री सोनवणे, क्रीडा शिक्षक कोरे व शिंदे उपस्थित होते. विद्यार्थी शार्दुल राऊत व रूचाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री सोनवणे यांनी आभार मानले.