न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- छोटा मुलगा तापट स्वभावाचा असल्याने त्याचे आई, वडील व मोठ्या भावासोबत सतत भांडणे होत असत. सततच्या भांडणाला वैतागून वडिलांनी मुलाच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारले व धारदार कटरने त्याच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला.
युवराज सावळे (वय २२) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजता हा प्रकार घडला. आरोपी वडिलांचे नाव अशोक सावळे (वय ४७) असे आहे. अशोक सावळे हे त्यांच्या पत्नी व दोन मुलांबरोबर मोशी येथील जुन्या जकात नाक्याजवळ राहत होते. भोसरी एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.