न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- महिलेकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निगडी येथे सापळा रचून पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले.
तिच्याकडे चौकशी केली असता, दोन लाख ४६ हजार १५० रुपये किमतीचा गांजा सापडला. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.