- तरुणीची पोलिसात धाव; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- आयटी कंपनीत फिर्यादी आणि आरोपी हे काम करत होते. आरोपी हा कंपनीत फिर्यादी तरुणीचा सिनियर असून, कंपनीत काम करताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला त्याच्या घरी नेले. तिथे तरुणीला दारू पाजून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
तरुणीचे फोटो त्याच्याकडे असून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा फोन करून घरी बोलावून घेतले. त्या दिवशी देखील आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने तरुणीला पुन्हा फोन करून घरी बोलावले. मात्र तरुणीने थेट पोलिसात धाव घेतली.
ही घटना ६ जून आणि १० जून रोजी रात्री बावधन येथे घडली. अभिनव दिलीपकुमार शांडेल्य (वय ३१, रा. बावधन. मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित तरुणीने शनिवारी (दि. २५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.