न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- भोसरी येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून संगणमत करून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच, हातात कोयते घेऊन फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना आरोपींनी ‘त्यांच्या नादी लागलात तर वाईट परिणाम होतील’ अशी धमकी दिली.
हा प्रसंग २५ जून रोजी रात्री ७. ३० च्या दरम्यान भोसरीतील आखाडा कुस्ती मैदानाच्या समोर घडला. अजय गायकवाड (वय १६ वर्षे, शांतीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
निखिल कसबे (वय २२ वर्षे रा. शांतीनगर), रोहित तुपरे (वय २२ वर्ष, आदिनाथनगर), वैजनाथ राजभर (वय १७ वर्षे, धावडेवस्ती), सुरज कुमार (वय १७ वर्षे, रा. इंद्रायणीनगर) हे आरोपी असून त्यांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.