- पिंपळे गुरवच्या शिवनेरी कॉलनी परिसरातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- कोयता, चॉपर, लाकडाने वाहनाची तोडफोड करून टोळक्याने राडा घातला. पिंपळे गुरव येथील शिवनेरी कॉलनी परिसरात गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी २० ते २५ वयोगटातील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष यशवंत वाघमारे (वय ४८, रा. शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शिवनेरी कॉलनीत दोन दुचाकीवरून आरोपी आले. तेथे फिर्यादीच्या चारचाकी वाहनाची कोयता, चॉपर, दगडाने तोडफोड केली. त्यामुळे यांनी घरातून पाहिले. तू खाली ये तुला दाखवतो आम्ही काय आहे, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले.
आरोपींनी बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ केली. पोलिसांना काही सांगितल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे जोरजोरात ओरडून कोयता फिरवत दहशत निर्माण करून दुचाकीवरून निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.