न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ७५ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहन निर्मला कुटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, लायन क्लबचे अध्यक्ष अंजुम सय्यद, लायन क्लबचे सेक्रेटरी इंदू सूर्यवंशी, लायन क्लबचे संचालक रुपाली शुक्ला, संजय कुटे, मा. पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, तात्या शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, राजेश गायकवाड, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान निर्मला कुटे फौंडेशनच्या वतीने दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कुटे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. मुख्याध्यापिकेच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून इ. १ ली ते इ १० वीच्या विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन स्वातंत्र्यदिवस साजरा झाला. यावेळी सर्व शिक्षकांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
सूत्रसंचालन लीना इंगवले यांनी तर, आभार नववीची विद्यार्थिनी तनिष्का कांबळे हिने केले.