- नद्यांना पूर; रस्त्यावरील वाहनांना जलसमाधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ सप्टेंबर २०२३) :- नगर शहरात पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या या पावसामुळे नगरकर हवालदिल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्यामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
https://youtube.com/shorts/29ytedVPRiI?feature=share
दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कडा परिसरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे नगर-बीड रोडवरील शेरी (बुद्रुक) येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने पाणी ओसरुस्तर पोलिस प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आष्टीकडून नगरकडे जाणारी वाहने शिराळ मार्गे नगरला. तर नगरकडून कडा आष्टीकडे जाणारी वाहने केरुळ मार्गे आष्टीकडे तात्पूरती वळविण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पाऊस असल्याने कुठलीही रिस्क न घेता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
आष्टी तालुक्यात विशेषता देसुर, बीड सांगवी, महादेव दरा, गणगेवाडी, कणसेवाडी म्हणजेच डोंगर भागात भरपूर असा जोराचा पाऊस चालू आहे. सर्व तलाव भरून बेलगावच्या तलावात मोठा पाण्याचा विसर्ग चालू आहे. थोड्याच वेळात बेलगावच्या तलावाच्या सांड्यावरतून पाणी पडेल आणि नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. रात्रीची वेळ आहे. बेलगावमधील नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन संतोष खेतमाळस, पोलिस निरिक्षक आष्टी यांनी केले आहे.