न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये एकाच वेळी विविध उपक्रम घेता यावेत. तसेच त्यांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करता यावे, यासाठी ‘कॅलेंडर’ (दिनदर्शिका) तयार केली आहे. ‘कॅलेंडर मध्ये दिनविशेष आणि विशेष उपक्रमांचाही अंतर्भाव आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करता यावी, यासाठी कॅलेंडर तयार केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पानावर उजव्या बाजूला उपक्रमांची माहिती आहे. ‘कॅलेंडर’मध्ये आकर्षक रंगीत चित्रांचा वापरला आहे. हे कॅलेंडर सर्व शाळेतील वर्गात दिले आहे. अकरा उपक्रमशील शिक्षकांनी कोणत्या महिन्यात काय उपक्रम किंवा दिनविशेष असतील, त्याप्रमाणे नियोजन केले आहे. त्यामध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शन मिळाले. कॅलेंडर आणखी आकर्षक आणि माहिती पूर्ण बनवून ते प्रत्येक शाळेत देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात यावेत, यासाठी दिनदर्शिका उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या उपक्रमाचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
जूनमध्ये विद्यार्थी स्वागत, शिक्षक कार्यशाळा, पालक बैठक, शालाबाह्य विद्यार्थी गृहभेटी, योगदीन आदींचा समावेश आहे. जुलैमध्ये इंग्रजी कार्यशाळा, मुख्याध्यापक कार्यशाळा, आरोग्य तपासणी या बाबी असतील. मनपा स्तरीय क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक भेटी, पोषण आहार गुणवत्ता तपासणी, शिक्षण परिषद, विज्ञान परिषद या उपक्रमांचाही अंतर्भाव आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक शाळांनी वैयक्तिक तसेच शालेय स्तरावर नियोजन करून शैक्षणिक दिनदर्शिकेचे वितरण केले आहे. या कार्यसंघातील मुख्य सदस्य म्हणून शाळेचे स्थान, सामाजिक संदर्भ आणि विद्यार्थी संख्या यांसारख्या बाबींचा विचार करून महत्त्वपूर्ण उपक्रमात योगदान देण्याचा विशेषाधिकार मला मिळाला याचा आनंद आहे.
– आनंदी जंगम, म्हेत्रेवाडी शाळा क्र.९२शैक्षणिक दिनदर्शिकेसाठी अगदी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये वर्षभरातील महत्त्वाच्या संकल्पना आणि सांस्कृतिक उत्सवांचा तसेच विविध महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. या दिनदर्शिकेत सर्व विषयांमधील विद्यार्थ्यांच्या आवडी चांगल्याप्रकारे दर्शविल्या गेल्या असून अचूकता आणि सर्वस मावेशक वेळापत्रकासाठी अनेक महत्वाच्या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
– जयश्री भुजबळ, कासारवाडी मुले व मुलींची प्राथमिक शाळाशाळांमध्ये एकाच वेळी उपक्रम व्हावेत, त्याचे पूर्वनियोजन करता यावे, यासाठी कॅलेंडर केले. पालिकेच्या उपक्रमशील शिक्षकांनी मिळून कॅलेंडर तयार केले आहे. या कॅलेंडरमुळे नवनवे उपक्रम घेणे सोयीस्कर ठरणार आहे. – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिपरी- चिंचवड महापालिका…