न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- एका वर्षापासून फरार असणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन एक कोयता व मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट गाडी तसेच ९३००० रोख रक्कम असा एकुण ६,९३, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चिंचवड तपास पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अशोक गरिबा तुपेरे (वय २४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं ५४० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२७), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३७ प्रमाणे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
वाकड पोलीस स्टेशन अभिलेखावर एनडीपीएसच्या १) वाकड पोलीस स्टेशन गुरनं. ७८४ / २०२२ भादवि कलम ३५३,३३२ एनडीपीएस अॅक्ट ८ (क) २०(ब) (ii) (अ) २९, २) वाकड पोलीस स्टेशन गुरनं. ६४९ / २०२३ एनडीपीएस अॅक्ट ८ (क) २०(ब) (ii) (व) २९ या दोन गुन्हयात आरोपी हा पाहीजे आरोपी असून त्याच्यावर १) वाकड पोलीस स्टेशन गु रजि नं. ११०९ / २०१८ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४,३४, २) वाकड पोलीस स्टेशन गुरजि नं. ९७१ / २०१८ भादवि कलम १४१, १४३, १४८, १४९,७०४, ३) वाकड पोलीस स्टेशन गुरनं. ८४२ / २०२१ एनडीपीएस अॅक्ट ८ (क) २०(ब) (ii) (31) स्प, ४) वाकड पो स्टे गुरनं. ७८४ / २०२२ भादवि कलम ३५३,३३२ एनडीपीएस अॅक्ट ८ (क) २० (ब) (ii) (अ) २९, (७) वाकड पोलीस स्टेशन गुरनं. ६४९ / २०२३ एनडीपीएस अॅक्ट ८ (क) २०(ब) (ii) (ब) २९, ६) वाकड पोलीस स्टेशन गुरनं. ३८७ / २०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३७ प्रमाणे, (७) चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं ५४० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२७),महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३७ याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगीरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त चिंचवड विभाग, दिलीप शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे, प्रकाश जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक एन.जे. तलवाडे व पोलीस हवालदार धर्मनाथ तोडकर, पोलीस हवालदार सागर आढारी, पोलीस नाईक सचिन सोनपेठे, पोलीस अंमलदार गोविंद डोके, पोलीस अंमलदार उमेश मोहीते, पोलीस अंमलदार रहिम शेख, पोलीस अंमलदार अमोल माने, पोलीस अंमलदार पंकज भदाणे, पोलीस अंमलदार राजेंद्र माळी, पोलीस अंमलदार सिधार्थ खैरे यांनी केली आहे.